काँग्रेसच्या ‘त्या’ तक्रारीची निवडणूक आयोगानं घेतली दखल!

काँग्रेसच्या ‘त्या’ तक्रारीची निवडणूक आयोगानं घेतली दखल!

मुंबई – काँग्रेसच्या तक्रारीची निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे. निवडणूक अयोगानं टीव्ही मालिकेतून प्रचार करणाऱ्या निर्मात्यांना कारणे दाखवा (show cause) नोटीस बजावली आहे. याबाबत 24 तासात खुलासा करण्याचे आदेशही निवडणूक आयोगानं दिले आहेत. कालच काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे मालिकेतून सरकारी योजनांचा प्रचार होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली असल्याचं अतिरिक्त निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी म्हटलं आहे.

आचारसंहिता भंग व जाणिवपूर्वक प्रेक्षकांचा विश्वासघात करत असल्याप्रकरणी झी टीव्ही, अॅन्ड टीव्ही या वाहिन्यांचे प्रक्षेपण तात्काळ थांबवून भाभीजी घर पर है, तुझसे है राबता या मालिकांच्या निर्माते व कलाकारांसह भारतीय जनता पक्षाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांकडे केली होती. त्यानंतर निवडणूक अयोगानं टीव्ही मालिकेतून प्रचार करणाऱ्या निर्मात्यांना कारणे दाखवा (show cause) नोटीस बजावली आहे.

COMMENTS