मुंबई – मॉकपोलनंतर मतदान यंत्रात पडलेली जवळपास ५० मतं नष्ट करण्यात आली नसल्यामुळे तसेच तीन मते अतिरिक्त आढळल्यामुळे निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत जळगाव मतदारसंघातील पाचोरा विधानसभा मतदारसंघात समाविष्ठ असलेल्या भडगाव शहरातील 107 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सदर केंद्रावर सोमवारी पुन्हा मतदान घेण्यात येणार आहे.
दरम्यान भडगाव शहरातील 107 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर आढळून आलेली 53 मते व्हीव्हीपॅटचा वापर झाल्याने काढून टाकता आली नाहीत. माॅकपोल दरम्यान पडलेली जास्तीची मते मतदानाची प्रक्रिया आटोपल्यानंतरच लक्षात आली होती. निवडणूक आयोगाकडे त्यासंदर्भात अहवाल पाठविण्यात आल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दोषी मतदान केंद्राध्यक्ष उद्धवराव पाटील आणि मतदान अधिकारी सुनीता देवरे यांना निलंबित केले आहे.
तसेच याठिकाणी पुन्हा मतदान घेण्याचे आदेश काढले आहेत. तसेच 23 तारखेला होते ते नियुक्त अधिकारी व कर्मचारी वगळून पूर्णतः नवीन पथक त्याठिकाणी नियुक्त करावे, असेही निवडणूक आयोगाने नव्या आदेशात म्हटले आहे.
COMMENTS