मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे दुष्काळातील कामांसाठी आचारसंहिता शिथील करण्याची विनंती केली होती. ही विनंती निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. दुष्काळी प्रदेशात काम करण्याची परवानगी निवडणूक आयोगानॆ सरकारला दिली आहे. परंतु केलेल्या कामाची प्रसिद्ध न करण्याच्या स्पष्ट सूचनाही निवडणूक आयोगाने राज्य सरकारांना दिल्या आहेत.
दरम्यान महाराष्ट्रात दुष्काळामुळे तीव्र चारा आणि पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत सरकारला कामे करता यावीत यासाठी आचारसंहिता शिथील करण्यात आली आहे. राज्य सरकारने याआधिच 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र राज्यातील अनेक भागात तीव्र चारा आणि पाणीटंचाई निर्माण झाली असून तात्काळ पावलं उचलणे गरजेचं आहे. याचाच विचार करुन निवडणूक आयोगान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विनंती मान्य करत आचारसंहिता शिथील केली आहे.
COMMENTS