मुंबई – २१ ऑक्टोबर रोजी, महाराष्ट्र व हरियाणा या दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसह १७ राज्यांमधील ५१ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांसाठी तसेच, महाराष्ट्रातील सातारा व बिहारमधील समस्तीपूर येथील लोकसभेच्या जागेसाठी मतदान होणार आहे.
त्यामुळे यादिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाने
एक्झिट पोल दाखवण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता, त्या दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत एक्झिट पोल दाखवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतटं ट्वीट निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्या शेफाली शरण यांनी केलं आहे.
EC announces ban on Exit Polls from 7 am to 6.30 pm on October 21
Read @ANI story | https://t.co/xsg0SH67DV pic.twitter.com/IGvKa2wby4
— ANI Digital (@ani_digital) October 15, 2019
दरम्यान महाराष्ट्र व हरियाणा येथील विधानसभा निवडणुकीसह अरुणाचल प्रदेश, आसम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, मध्यप्रदेश, मेघालय, ओदिशा, पुद्दुचेरी, पंजाब, राजस्थान, सिक्किम, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तरप्रदेश या १७ राज्यांधील ५२ विधानसभा मतदारसंघात व महाराष्ट्रातील सातारा आणि बिहारमधील समस्तीपुर लोकसभा मतदार संघात पोटनिवडणुक होणार आहेत. तर, २४ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी माध्यमांनी एक्झिट पोल दाखवू नयेत असं म्हटलं आहे.
No political party or candidate…to publish any advertisement in Print Media on the day of poll & one day prior to poll in Haryana & Maharashtra,ie 20th & 21st October, unless contents are got pre-certified from Media Certification & Monitoring Committee https://t.co/Fge4PxZ1U6
— Sheyphali Sharan (@SpokespersonECI) October 15, 2019
COMMENTS