पालघर – पालघर पोटनिवडणुकीदरम्यान भाजपनं आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक अधिका-यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षांना नोटीस बजावली आहे. दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे छायाचित्र आपल्या उमेदवाराच्या प्रचारात वनगा कुटुंबीयांच्या अनुमतीविना वापरल्याप्रकरणी त्यांनी ही नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबतची तक्रार वनगा यांच्या कुटुंबीयांनी आणि शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने केली होती.
दरम्यान जिल्ह्याच्या आचारसंहिता अंमलबजावणी समन्वयक अधिका-याने ही नोटीस बजावली असून त्याबाबत आपले म्हणणे २३ मे ला सकाळी ११ वाजता मांडण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच याबाबतचं म्हणणे स्वत: अथवा प्राधिकृत व्यक्तीमार्फत मांडण्याचे आदेश देण्यात आले असून हे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर त्याबाबत पुढील कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं दिसून येत आहे.
COMMENTS