नवी दिल्ली – आगामी निवडणुकींबाबत निवडणूक आयोगानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. या त्रामध्ये राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांमधून ‘नोटा’ हा पर्याय हटवण्याचा आदेश निवडणूक आयोगानं दिला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयानं राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत ‘नोटा’ हा पर्याय न ठेण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर आयोगानं हे पत्र पाठवून ‘नोटा’ हा पर्याय काढून टाकण्याचा आदेश दिला आहे.
दरम्यान निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत यापुढे ‘नोटा’ हा पर्याय दिसणार नाही त्यामुळे मतदाराला कोणत्याही एका उमेदवाराला मतदान करावं लागणार आहे.राज्यसभेची मतदान प्रक्रिया गुंतागुंतीची असते, त्यामध्ये ‘नोटा’चा वापर केल्यास क्लिष्टतेत वाढ होणार असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं होतं. त्यानंतर निवडणूक आयोगानं हा आदेश दिला आहे.
COMMENTS