कपिल पाटलांच्या मागणीची निवडणूक आयोगाकडून दखल !

कपिल पाटलांच्या मागणीची निवडणूक आयोगाकडून दखल !

नवी दिल्ली – मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांच्या मागणीची दखल आमदार कपिल पाटील यांनी घेतली आहे. कपिल पाटील यांनी मे महिन्याच्या सुट्टीत लागलेल्या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी केली होती. त्यामुळे त्यांच्या मागणीची दखल घेत निवडणूक आयोगानं राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलली आहे. मे महिन्याची सुट्टी संपल्यानंतर निवडणूक होण्याची शक्यता असून निवडणूक आयोगकडून लवकरच तारीख जाहीर केली जाणार आहे.

दरम्यान दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघासाठी 8 जूनला मतदान होणार होतं. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर या चारही निवृत्त होणाऱ्या विद्यमान विधानपरिषद सदस्यांची मुदत 7 जुलै 2018 रोजी संपत आहे. त्यामुळे 8 जुनला मतदान घेण्यात येणार होतं. परंतु 8 जून रोजी निवडणूक झाल्यास सुट्टीसाठी बाहेरगावी गेलेले मतदार मतदानापासून वंचित राहतील, असा दावा पाटील यांनी केला होता. शिवाय शाळा 15 जून आणि 18 जून रोजी सुरु होत असून त्याआधी 8 जून रोजी शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील मतदारांना परत येणं अशक्य असल्याचं कपिल पाटील यांनी म्हटलं होतं.

त्यामुळे आता निवडणूक आयोगाने कपिल पाटील यांच्या मागणीची दखल घेतली असून ही निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी लवकरच तारीख जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती असून याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS