विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 1 डिसेंबरला निवडणूक – कोण आहेत इच्छुक उमेदवार ? पाहा स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 1 डिसेंबरला निवडणूक – कोण आहेत इच्छुक उमेदवार ? पाहा स्पेशल रिपोर्ट

मुंबई – राज्यातल्या सोमवारी जाहीर झालेल्या विधान परिषदेच्या 5 जागांची निवडणूक जाहीर झाली आहे. राज्यातल्या महाविकास आघाडीची जनतेमधून पहिली परिक्षा येत्या 1 डिसेंबर रोजी होणार आहे. राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी येत्या 1 डिसेंबरला मतदान आहे. या पाच जागांमध्ये 3 पदवीधर मतदारसंघ तर दोन शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे. या मतदारसंघामध्ये पुणे पदवीधर मतदारसंघ, मराठवाडा पदवीधर मतदारसंघ आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ असे तीन पदवीधर मतदारसंघ आहेत. तर पुणे शिक्षक मतदारसंघ आणि अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. याची मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातून गेल्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आमदार होते. गेल्यावेळी राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाल्यामुळे कसेबसे चंद्रकांत पाटील निवडूण आले होते. यावेळी मात्र ते विधानसभेवर निवडून गेल्यामुळे भाजपला नवा उमेदवार शोधावा लागणार आहे. पुण्यात भाजपकडून मकरंद देशपांडे,  सांगलीचे देशमुख इतर काहीजण इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादीकडून गेल्यावेळी बंडखोरी करणारे सांगलीचे अरुण  लाड, सोलापूरचे उमेश पाटील हे दोघे इच्छुक असल्याची चर्चा आहे.

औरंगाबाद पदवीधरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सतिश चव्हाण विद्दमान आमदार आहेत. गेल्यावेळी आघाडीची स्थिती अत्यंत बिकट असतानाही त्यांनी पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवला होता. यावेळीतर त्यांच्यासोब शिवसेनाही आहे. त्यामुळे त्यांना निवडणूक सोपी जाईल अशी चर्चा आहे.

https://www.facebook.com/1956222877957115/posts/2924304421148951/

तर दुसरीकडे भाजपकडून मात्र उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. गेल्यावेळी पराभूत झालेले शिरीष बोराळकर दुसय्रांदा नशीब आजमावू पाहत आहेत. पण त्यांना प्रवीण घुगे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील व्यवस्थापन परीषदेचे सदस्य किशोर शितोळे यांची देखील मोठी स्पर्धा आहे. शितोळे हे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या माध्यमातून मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.

नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे अनिल सोले हे विद्यमान आमदार आहेत. यावेळी सोले यांच्यासोबतच भाजपकडून नागपूरचे विद्यमान महापौर संदीप जोशी इच्छुक असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे उमेदवारीची नक्की माळ कोणाच्या गळत्यात पडते ते पहावं लागेल. तर दुसरीकडे काँग्रेसकडून अभिजीत वंजारी यांची उमेदवारी निश्चित असल्याचं बोललं जातंय.

तर शिक्षक मतदरासंघातून अमरावती विभातून श्रीकांत देशपांडे आणि पुणे विभागातून दत्तात्रय सावंत यांचा कार्यकाळसुद्धा जुलै महिन्यात संपला आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS