आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र ? राज्य सरकार पाठवणार अहवाल !

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र ? राज्य सरकार पाठवणार अहवाल !

मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याबाबत राज्य सरकार लवकरच केंद्र सरकारकडे अहवाल सादर करणार आहे. याबाबतची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. देशभरातील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याबाबत केंद्र सरकारनं प्रत्येक राज्याला अहवाल देण्याबाबत सूचना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात दोन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश आहे. ही समिती सर्व लोकप्रतीनिधी, सनदी अधिकारी आणि विविध संस्था यांच्याशी चर्चा करुन हा अहवाल पाठवणार असून येत्या चार महिन्यात राज्याचा अहवाल सादर करण्यात येणार असल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान देशामध्ये घेण्यात येणा-या विविध ठिकाणच्या निवडणुकांमुळे सुमारे 315 दिवस आचरसंहितेमध्ये जातात. याचा परिणाम राज्याच्या कामावर, प्रशासनावर व विकासावर होतो. त्यामुळे आगामी निवडणुका एकत्र घेण्याबाबत सर्व राज्यातील अहवाल केंद्र सरकारकडे पाठवले जाणार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्या जाणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS