मुंबई – गेल्या १६ दिवसांपासून आझाद मैदानावर सुरु असलेलं मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उपोषण मागे घेतलं आहे. मराठा आरक्षणासाठी या कार्यकर्ते उपोषणाला बसले होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या कार्यकर्त्यांचं उपोषण सोडण्यासाठी मध्यस्थी केली होती. त्यामुळे महाजन यांना अखेर यश आलं असून या कार्यकर्त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. १० दिवसांत मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
दरम्यान आज गिरीश महाजन यांनी उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. यादरम्यान मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आणि गिरीश महाजन यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. विधिमंडळ अधिवेशनात याबाबत योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन महाजन यांनी दिले असल्याची माहिती आहे. तसेच या तरुणांच्या ९ मागण्यात आहेत. यातील मुख्य मागणी आरक्षणाची आहे. आरक्षणाबाबत तातडीने निर्णय घेतला जाणार असल्याचंही महाजन यांनी म्हटलं आहे.
COMMENTS