मुंबई – भाजपच्या ज्येष्ठ महिला नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. याबाबतची भूमिका त्यांनी फेसबुकवर जाहीर केली असून त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
सूर्यकांता पाटील यांची फेसबुक पोस्ट
आता थांबावे असे वाटत नाही. ना किसींसे दोस्ती ना किसींसे बैर ! खूप प्रेम मिळाले जळणारे होते पण प्रेम करणाऱ्यांची संख्या अधिक होती मला ते सर्व मिळाले जे एक सामाजिक जीवनात असणाऱ्या व्यक्तीला मिळायला हवे.43 वर्ष राजकारणात होते एखाद्या राजकुमारीसारखी राहिले 400 रुपयांची साडी 4000 हजाराच्या थाटात नेसली. मिळालेले काम मन लावून केले. आता आजूबाजूला असणारे लोक अनोळखी वाटत आहेत आणि अश्या अनोख्या प्रांतात माझ्यासारखी मनस्वी रमू शकत नाही. राजीनामा लिहून तयार होता पण मी आहेच कोण म्हणून एवढा शो करायचा.सगळ्यांनीच प्रेम दिले सन्मान दिला काहीच तक्रार नाही. आपलीच लायकी नाही हे समजले होते रागात घेतलेले निर्णय असेच असतात ते योग्य की अयोग्य हे सारासार बुद्धीला जेव्हा ठरविता येते नाही तिथे तोंडाला नवा रंग लावून विचार बदलत नाहीत हे पक्के समजलंय त्यामुळे धाकटे लोक राजकारण सोडतो म्हणत असताना मला आता काय मिळवायचे आहे. एकटीने सगळे जिंकले लोकांना कंटाळा येईपर्यंत प्रवास करायची माझी तयारी नाही.ज्यांच्यासाठी काम केले त्यांनी सन्मानही केला आणि आज जे नाहीच आहेत त्यांच्या आठवणी मनात आहेत.
आhttps://m.facebook.com/story.php?story_fbid=1289049537963866&id=100005764961448
पण फार खुज्या प्रांतात प्रवासी झालो याची खंत आहे. पण माझा निस्वार्थ प्रवास मला फार समृद्ध करून गेला. जेव्हा लिहायचे तेव्हा लिहिलं पण आज मी माझा राजकीय प्रवास थांबवीत आहे.
या पुढे नव्या पिढीसाठी काम करील घरी बसणार नाही.बसून कुरवळण्या एवढे काही नाही माझ्या जवळ विचारांची शिदोरी घेऊन आज मी माझे राजकारण थांबवीत आहे. सगळ्या सहप्रवासी सहकाऱ्यांचे हार्दिक आभार. मी आहे कधीही या घर आणि मी तुमचीच आहे. नमस्कार सगळ्यांना थांबते.
COMMENTS