महिलांच्या शौचालयात जाऊ दिले नाही म्हणून माजी खासदाराच्या मुलाचा राडा, युवतीवर रोखला पिस्तूल !

महिलांच्या शौचालयात जाऊ दिले नाही म्हणून माजी खासदाराच्या मुलाचा राडा, युवतीवर रोखला पिस्तूल !

नवी दिल्ली – महिलांच्या शौचालयात जाऊ दिले नाही म्हणून माजी खासदाराच्या मुलानं दिल्लीतील पाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राडा केला आहे. महिलांच्या शौचालयात जाऊ दिले नाही म्हणून चिडलेल्या खासदार मुलाने थेट मुलीवर पिस्तूल रोखला आहे. दिल्लीतील फाईव्ह स्टार हॉटेल हयात येथे ही घटना घडली असून सीसीटीव्हीमध्ये दृश्य कैद झाले आहेत.

 

बहुजन समाज पार्टीचे (बसपा) माजी खासदार राकेश पांडे यांचा मुलगा आशिष पांडे याने युवतीवर पिस्तूल रोखला आहे. धक्कादायक म्हणजे आशिष पांडे हा महिला शौचालयामध्ये जात होता, त्यावेळी तरुणीने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. यानंतर त्याने पिस्तूल रोखत युवतीला गोळी मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली असल्याची माहिती आहे. दरम्यान याबाबत पोलिसांनी आशिष पांडेवर गुन्हा दाखल केला आहे.

आशिष पांडेचे वडील राकेश पांडे आंबेडकरनगरमधून बसपाचे खासदार होते. सध्या जलालपूरमधून आशिषचा भाऊ रितेश आमदार आहे. आशिष पांडेचा सख्खा काका माजी आमदार आहे. आशिष पांडे हा बांधकाम व्यावसायिक आहे. राजकीय पार्श्वभूमी व पैशाची मस्ती आल्यामुळे त्याने हे कृत्य केलं असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS