पाच राज्यांपैकी तीन राज्यात काँग्रेसची सत्ता येणार, भाजपला मोठा धक्का – एक्झिट पोल

पाच राज्यांपैकी तीन राज्यात काँग्रेसची सत्ता येणार, भाजपला मोठा धक्का – एक्झिट पोल

नवी दिल्ली – राजस्थान, मध्यप्रदेश, मिझोराम, तेलंगणा आणि छत्तीसगड या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकांचे एक्झिट पोल हाती आले आहेत. विविध संस्थांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार या पाच राज्यांपैकी तीन राज्यात काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

मध्य प्रदेश एकूण 230 जागा

भाजप – 94

काँग्रेस – 126

इतर -10

राजस्थान एकूण 199 जागा

भाजप – 83

काँग्रेस – 101

इतर – 15

छत्तीसगड एकूण 90 जागा

भाजप – 52

काँग्रेस – 35

इतर – 02

तेलंगणा एकूण 119 जागा

तेलंगणात पुन्हा एकदा चंद्रशेखर राव यांचे सरकार बनणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. टीआरएसला ६६, भाजपला ७, काँग्रेसला ३७ तर अन्य पक्षांना ९ जागा मिळतील असा अंदाज रिपब्लिक आणि सी व्होटरनं वर्तवला आहे.

दरम्यान २०१९ ला होणा-या महा फायनलची या पाच राज्यांमधल्या निवडणुका म्हणजे महा सेमिफायनल आहेत. या निवडणुकांचा निकाल ११ डिसेंबरला स्पष्ट होणार आहे. एक्झिट पोलचा अंदाज काँग्रेससाठी चांगला असल्याचे दिसून येत आहे. तर भाजपसाठी तारेवरची कसरत असल्याचे दिसून येत आहे. पुन्हा सत्ता राखण्यासाठी भाजपला यश येते की नाही हे ११ डिसेंबरला स्पष्ट होणार आहे.

COMMENTS