मुंबई – राज्यातील विविध भागात कालपासून पावसानं मोठी हजेरी लावली आहे. मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे त्या भागातील शेतकय्रांचं मोठं नुकसान झालं आहे.
आणखी दोन दिवस हा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. हवामान विभागानं 13 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत राज्यात विजेच्या कडाकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. विशेषतः किनारपट्टी लगतच्या सर्व जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्याची नोंद घेऊन नागरिकांनी खबरदारी घ्यावी. पोलीस व प्रशासनानं सतर्क राहण्याच्या सूचना संबंधित जिल्हा व पोलीस प्रमुखांना दिल्या. अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सतर्क राहण्याचे व बचावकार्य तत्परतेनं करण्याचे निर्देश दिलेत.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 15, 2020
हवामानातल्या बदलामुळे राज्यावर आसमानी संकट असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे याचं रुपांतर मोठ्या वादळात होण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
COMMENTS