“मोदी सरकारची एक्सपायरी डेट जवळ आली आहे !”

“मोदी सरकारची एक्सपायरी डेट जवळ आली आहे !”

नवी दिल्ली – मोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आली असल्याचं वक्तव्य तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन यांनी केलं आहे. तृणमूल काँग्रेसचे चाळीस आमदार आमच्या संपर्कात आहेत असा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता. त्यानंतर डेरेक ओ ब्रायन यांनी मोदींवर टीका केली आहे. तृणमूलचे ४० आमदार सोडा, तुमच्यासोबत एक सल्लागारही येणं कठीण असल्याचंही ब्रायन यांनी म्हटलं आहे.

दरम्यन ममतादीदींचे ४० आमदार तृणमूल काँग्रेसला रामराम करून भाजपामध्ये प्रवेश करतील असा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील सभेत केला आहे. मोदी यांनी केलेल्या या दाव्यानंतर पश्चिम बंगालमधील राजकारणात खळबळ उडाली आहे. यानंतर आता तृणमूलचे नेते डेरेक ओ ब्रायन यांनी या सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आल्याची टीका केली आहे. तसेच मोदींनी घोडेबाजार केल्याची तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे करणार आहोत असंही ब्रायन यांनी म्हटलं आहे.

COMMENTS