बीड – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमरसिंह पंडित यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. नरहरी शेळके यांनी पंडित यांच्याविरुद्ध खंडणीखोरीची तक्रार दाखल केली आहे. तसे त्यांचे स्वीय सहाय्यक जालिंदर राऊत यांच्याविरुद्ध धमकी दिल्याची तक्रार दाखल केली असून ‘पंडित हे महसूल मंत्र्यांकडे तुमच्याविरुद्ध तक्रार करणार आहेत. तेव्हा त्यांची भेट घेऊन तोडपाणी करा,’ असा निरोप सुभाष पाटील नावाच्या व्यक्तिने आपल्याकडे पोहचवला होता, असे शेळके यांनी तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान आमदार अमरसिंह पंडित यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून या प्रकरणात दोषी आढळलो तर राजकारणातून संन्यास घेईन, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच शेळके यांच्यासारख्या भ्रष्ट अधिकार्याच्या तक्रारीला आणि दबावाला मी घाबरणार नाही, जनसामान्यातील माझी प्रतिमा डागाळण्याचा हा कुटील डाव असून त्यांचा बोलविता धनी कोण?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
COMMENTS