मुंबई – 4 जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचा आदेश राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. फडणवीस यांच्याविरोधात विरोधात प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हेगारी खटल्याची माहिती लपविल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती. यावर नागपूर न्यायालयाने आज देवेंद्र फडणवीस विरोधातील सुनावणी पुढे ढकलली आहे. आज सुनावणी दरम्यान ते अनुपस्थित होते. परंतु त्यांच्या वकिलानं आज त्यांची बाजू मांडली.
दरम्यान 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी प्रतिज्ञापत्र दाखल करताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या 2 गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केली आहे. यानंतर सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नागपूरच्या न्यायालयाला खटला चालू ठेवण्याचे आदेश दिले होते. यानंतर नागपूर न्यायालयाने आज दोन्ही बाजूचे युक्तीवाद पूर्ण झाले असून पुढील सुनावणी 4 जानेवारीला होणार असल्याचे सांगितले आहे. या सुनावणीला हजर राहण्याचा आदेश फडणवीस यांना देण्यात आला आहे.
COMMENTS