नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज नाशिकमध्ये सभा पार पडली. या सभेत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. पहिल्या तीन टप्प्यात काँग्रेस राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला आहे. पवारांनी पॅड घातलं, ग्लोव्ह्ज घातले पण मोदींची गुगली पाहून पॅव्हिलियनमध्ये निघून गेले. त्यांना निवडणुकीत भाड्याने वक्ते आणावे लागतं आहेत. पवार साहेबांनी रेल्वेचं इंजिन भाड्याने घेतलं. पण तोंडाच्या वाफेने इंजिन चालत नाही, ते गल्लीत बंद पडलं आहे. इंजिनला मोदींनी पछाडलं आहे. राज साहेब तुमचं दुकान नोटबंदीने बंद झालं असल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
दरम्यान राज ठाकरेंना नाशिकच्या जनतेने महापालिकेची सत्ता दिली. मात्र त्यांनी काहीही कामं केली नाही. कुंभमेळ्या दरम्यान युती सरकारने नाशिकमध्ये कामं केली. राज ठाकरे केवळ फुकटचं श्रेय लाटत आहेत,
आमची कुठेही शाखा नाही अशी यांची परिस्थिती झाली आहे. नाशिकच्या जनतेनं तुम्हाला घरी पाठवलं. नाशिकच्या विकासाची कामं आमच्या पैशांनी झाली. राज ठाकरे तुम्ही तुमचे नगरसेवक आणले होते आणि म्हणाले होतात, महापालिकेचा हिस्सा सिंहस्थाला देऊ शकत नाही. आमच्या पैशाने शहरात कुंभात विकासाची कामं केली. तुमचं नेमकं कर्तृत्व काय असा आमचा सवाल असल्याचंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
COMMENTS