मुंबई – देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. फडणवीस यांनी निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील दोन फौजदारी गुन्ह्यांचा उल्लेखच केलेला नाही. मुख्यमंत्री स्वतःचा कारभार पारदर्शक असल्याचं सांगतात. पण प्रतिज्ञापत्रात त्यांनीच दोन गुन्हे लपवले आहेत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे.
सुप्रीम कोर्ट मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांची निवड तर रद्द करेलच पण जे मुख्यमंत्री पारदर्शकतेबाबत गप्पा मारतात आणि माहिती लपवतात, त्यांना मुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. – @nawabmalikncp
— NCP (@NCPspeaks) December 13, 2018
दरम्यान फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील दोन फौजदारी प्रकरणांचा समावेश केला नसल्याचा दावा करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान गुरुवारी सुप्रीम कोर्टाने फडणवीस यांना नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
COMMENTS