उत्तर प्रदेशचे – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचं नामांतर अयोध्या केलं आहे. आम्ही आमचा भूतकाळ पुन्हा जोडण्यासाठी अयोध्येला आलो आहोत. अयोध्या ही रामाची ओळख आहे. अयोध्येची ओळख अयोध्या अशीच राहिली आहे. अयोध्येसोबत कोणीही अन्याय करु शकत नाही असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. तसंच एक नवीन संकल्प घेऊन आलो आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.
Ayodhya hamari aan baan shaan ka prateek hai, Ayodhya ki pehchan Bhagwan Ram se hai. Aaj se is janpad(Faizabad) ka naam bhi Ayodhya hoga: UP CM Yogi Adityanath #Diwali pic.twitter.com/PNTSOHvM2v
— ANI UP (@ANINewsUP) November 6, 2018
दरम्यान यावेळी योगी आदित्यनाथ यांनी आणखी दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. अयोध्येत मेडिकल कॉलेज सुरु करण्यात येणार असून त्याला राजा दसरथाचं नाव देण्यात येणार आहे. तसंच एक विमानतळ उभारण्यात येणार असून त्याला प्रभू रामाचं नाव देणार असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केलं आहे.या कार्यक्रमासाठी दक्षिण कोरियाच्या फर्स्ट लेडी किंवा प्रथम नागरिक किम जुंग सूक या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
COMMENTS