मुंबई- कृषी विधेयकाच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. कायद्यात सुधारणा करण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण कायदा रद्द करण्याची मागणी लोकशाहीला घातक आहे, असे मत व्यक्त केले.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना कायद्यात सुधारणा करण्याबाबत आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण शेतकऱ्यांनी आडमुठी भूमिका ठेवून कायदा रद्द करुन घेतल्यास सर्व समाजातील लोक अशाच प्रकारची मागणी करतील, अशी शक्यता व्यक्त केली.
COMMENTS