मुंबई – केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असून अंबानी अदानी यांच्यासारख्या उद्योगपतींच्या भल्यासाठी आहेत. तसेच मागील महिन्याभरापासून दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने मुंबईमध्ये अंबानी व अदानी यांच्या कार्पोरेट कार्यालयावर मोर्चा काढला.
यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, शेकापचे आमदार जयंत पाटील, बाबा आढाव, प्रतिभा शिंदे आदी नेत्यांसह अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे नेते उपस्थित होते. या आंदोलनात राज्य भरातून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी कृषी कायदा आणि अंबानी, अदानींच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
दरम्यान, मंत्री बच्चू कडू यांना पोलिसांनी नागपुरातच रोखून धरलं आहे. महत्वाची बाब म्हणजे बच्चू कडू यांना वरिष्ठांच्या आदेशानुसारच अडवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बच्चू कडू थांबलेल्या विश्रामगृहाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने मुंबईमध्ये अंबानी व अदानी यांच्या कार्पोरेट कार्यालयावर काढलेला मोर्चा !@diljitdosanjh @PTI_News @ANI pic.twitter.com/g0HZpgBrgd
— Raju Shetti (@rajushetti) December 22, 2020
COMMENTS