नवी दिल्ली – शेतक-यांच्या प्रश्नांवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समितीनं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे. आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट या संघटनेच्या नेत्यांनी घेतली आहे. शेतक-यांची कर्जमुक्ती आणि दीडपट हमीभाव द्यावा यासंदर्भात संसदेत विधेयक संमत करण्याची विनंतीही या नेत्यांनी केली आहे. या ठरावाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, बीजेडी यांनी पाठिंबा दिला आहे.
दरम्यान आज अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समितीनं रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आहे. देशभरात सुरु असलेल्या शेतक-यांच्या विविध प्रश्नांबाबत या शेतक-यांनी कोविंद यांची भेट घेतली. तसेच या भेटीदरम्यान शेतक-यांची कर्जमुक्ती आणि दीडपट हमीभाव द्यावा यासंदर्भात संसदेत विधेयक संमत करण्याची विनंतीही केली आहे. त्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या समितीची मागणी मान्य करणार का याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS