राज्यातील शेतकऱ्यांसमोर आणखी एक अडचण उभी राहण्याची चिन्हं ! शेतक-यांसाठीची खत विक्री आता पीओएस मशीनद्वारे करणे बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. पीओएस मशीनद्वारे खरेदी केलेल्या खतावरच अनुदान मिळणार मिळणार आहे. राज्यातल्या 20 हजार 988 अनुदानित खत वितरकांना पीओएस मशीनचे मोफत वाटप करणार असल्याची माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली आहे. १ नोब्हेंबरपासून पीओएस मशिनद्वारे खत विक्री बंधनकारक असेल. खत खरेदीसाठी आधार क्रमांकही सक्तीचा असणार आहे.
28 ते 30 ऑक्टोबर रोजी विशेष मोहिम राबवून खतांचा साठा ‘पीओएस’ मशीनमध्ये नोंदविला जाणार आहे. यासाठी तालुक्याच्या ठिकाणी वितरक मशीन घेऊन येणार असून नोंदीची मोहिम राबविली जाणार आहे. महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे 60 लाख मेट्रीक टन अनुदानित खतांची विक्री होते. त्यामध्ये खरीप हंगामात 33 लाख मेट्रीक टन आणि रब्बी हंगामात 27 लाख मेट्रीक टनाची उलाढाल होते. खत खरेदीसाठी शेतकऱ्याने दुसऱ्या व्यक्तीस पाठवले तर त्याचाही आधारक्रमांक नोंदविण्यात येणार आहे.
COMMENTS