शपथ घेतल्यानंतर काही तासातच कमलनाथ यांचा शेतक-यांना दिलासा, 2 लाख रुपयांपर्यंत शेतक-यांचे कर्ज माफ !

शपथ घेतल्यानंतर काही तासातच कमलनाथ यांचा शेतक-यांना दिलासा, 2 लाख रुपयांपर्यंत शेतक-यांचे कर्ज माफ !

भोपाळमध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी शपथ घेतली आहे. आज सरकार सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच दिवशी शेतक-यांबाबत कमलनाथ सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. कमलनाथ यांनी शेतक-यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला असून मुख्यमंत्री कमलनाथ यांनी याबाबत घोषणा केली आहे. शेतकऱ्यांची कोणत्याही नियम आणि अटींशिवाय सरसकट लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली आहे.

दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारात मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. निवडणूक विजयानंतर राहुल यांनी कर्जमाफीवर केलेल्या विधानावरून विरोधकांकडून त्यांना टार्गेट करण्यात आलं. पण अखेर काँग्रेसने कर्जमाफी करून विरोधकांना उत्तर दिलं आहे. कर्जमाफीशिवायच स्थानिक पातळीवर चालणारा प्रचंड भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, ग्राम पंचायत पातळीवर गोशाळा उभारणी हे प्रश्न मार्गी लावणं, हे आपल्या सरकारचे पहिले प्राधान्य असणार असल्याचंही मुख्यमंत्री कमलनाथ यांनी म्हटलं आहे.

COMMENTS