शेतकऱ्याला मालक बनवण्यासाठी हे कृषी कायदे – फडणवीस

शेतकऱ्याला मालक बनवण्यासाठी हे कृषी कायदे – फडणवीस

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रानस्फर करणार आहेत. आमच्या शेतकऱ्याला मुक्ती मिळाली पाहिजे, जिथे माल विकायचा आहे तिथे विकता आला पाहिजे आणि त्यासाठी बंधन नसलं पाहिजे. शेतकऱ्याला मालक बनवण्यासाठी मोदींनी हे कायदे आणले आहेत,” असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पुणे येथील मांजरी बुद्रूक येथे शेतकरी संवाद यात्रेत सहभागी झाले. फडणवीस म्हणाले, दिल्लीच्या वेशीवर गेल्या एक महिन्यापासून शेतकरी आंदोलन सुरु असताना भाजपाकडून संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आलेल्या वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत आणि खासकरुन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपाकडून संवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते राज्याच्या वेगवेगळ्या भागात शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत.

“जेव्हा लॉकडाउन सुरु होता तेव्हा कोकणातील शेतकऱ्यासमोर आंब्याचं काय होणार हा प्रश्न होता. पण आपण फळे नियमनमुक्त केल्याने शेतकऱ्याला मुंबईच्या सोसायट्यांमध्ये माल विकता आला. आंब्याच्या बागायतादारांनी मला साहेब जितका पैसा लॉकडाउनध्ये कमावला तितका याआधी कमावला नसल्याचं सांगितलं. कारण आम्ही सोसायट्यांमध्ये माल विकू शकलो,” अशी माहिती फडणवीसांनी दिली.

COMMENTS