शेतक-याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी प्रकरणावरुन राज्यात संताप, रामराज्य नव्हे हे तर हरामांचे राज्य – धनंजय मुंडे

शेतक-याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी प्रकरणावरुन राज्यात संताप, रामराज्य नव्हे हे तर हरामांचे राज्य – धनंजय मुंडे

बुलढाणा – एकीकडे शतक-यांना पीककर्ज देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. आता तर बँकाच्या अधिका-यांची एवढी मुजोरी आणि मस्ती वाढली आहे. की पीककर्ज देण्याच्या बदल्यात शेतक-याच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी करण्यापर्य़ंत मजल एका शाखाअधिका-याची गेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील दाताळा या गावात हा भयंकर प्रकार समोर आला आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखाअधिका-यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे.

पीककर्जासाठी दाताळा गावातील एक शेतकरी दांपत्य गावातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेलं. तिथं गेल्यानंतर कागपत्रांची तपासणी केल्यानंतर त्या दांपत्याकडे मोबाईल नंबर मागण्यात आला. संबधित शेतक-याने त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर दिला. त्यावर शाखाधिकाऱ्याने अश्‍लिल संभाषण करून शरीरसुखाची मागणी केली. शरीरसुख मिळाल्यास मोबदल्यात पीककर्जासोबत वेगळे पॅकेज देईन, असा निरोप शिपायामार्फत महिलेला पाठविला. संबंधित महिलेने बॅंक व्यवस्थापकाशी झालेल्या संवादाचे रेकॉर्डींग करून मलकापूर ग्रामीण पोलिसात तक्रार नोंदविली.

त्यानुसार पोलिस निरीक्षक बी. आर. गावंडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तपासचक्रे फिरविली. चौकशी अंती गुरुवारी रात्री महिलेच्या तक्रारीवरून सेंट्रल बॅंकेचे शाखाधिकारी राजेश हिवसे व शिपाई मनोज चव्हाण या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान या प्रकरणावरु सरकावर चौफेर टीका सुरू झाली आहे. पिककर्जाच्या बदल्यात बँक मॅनेजरने शेतक-याच्या पत्नीकडे केलेली शरीरसुखाची केलेली मागणी ही बातमी एकूण तळपायाची आग मस्तकाला जात आहे. अशा सरकारचा कडेलोट केला पाहीजे, त्यांना भर चौकात फाशी दिली पाहिजे. फडणवीस साहेब तुमचे हे रामराज्य नाही तर हरामांचे राज्य झाले आहे अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

बुलढाण्यात पीक कर्जाच्या बदल्यात शेतक-याच्या पत्नीकडे बँक अधिका-याने शरीरसुखाची मागणी केल्याची बातमी संतापजनक आणि क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात शेतक-यांवर एवढी वाईट वेळ कधी आली नव्हती ती भाजप सरकारने आणली अशी टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. दरम्यान शेतकरी वर्गातूनही या प्रकरणी घृणास्पद प्रकरामुळे प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

COMMENTS