शेतक-यांचा मोर्चा आझाद मैदानावर !

शेतक-यांचा मोर्चा आझाद मैदानावर !

मुंबई– विविध मागण्यांसाठी नाशिकहून निघालेला शेतक-यांचा किसान मोर्चा आझाद मैदानावर धडकला आहे. आज पहाटे हा मोर्चा आझाद मैदानावर दाखल झाला आहे. संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला भाव, वनजमिनींचं हस्तांतरण अशा मागण्या मान्य केल्याशिवाय आता मुंबई सोडणार नाही, अशी गर्जना शेतकऱ्यांनी केली आहे.

आज सकाळी ठाण्याहून मोर्चा मुंबईकडे निघणार होता, परंतु दहावी-बारावीच्या परीक्षार्थींना त्रास होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी त्रास सोसत रात्रीच आझाद मैदान गाठलं आहे. सोमय्या मैदानातून रात्री उशीरा मोर्चेकऱ्यांनी आझाद मैदानाकडे कूच केली. या मोठ्या प्रवासामुळे अनेक शेत-यांचे पाये रक्ताळले आहेत. चालण्याचं प्रमाण जास्त झाल्यामुळे जवळपास सर्वच शेतक-यांच्या पायाला फोड आले असल्याचं दिसून आलं.

या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली असून आंदोलकांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीमध्ये एकूण ६ मंत्र्यंचा समावेश असून चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा, सुभाष देशमुख यांचा समावेश आहे.

 

COMMENTS