सलाम शेतकरी बांधवांना, मुंबईकरांना आणि 10 वीच्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून, मुंबईत रात्रभर पायपीट !

सलाम शेतकरी बांधवांना, मुंबईकरांना आणि 10 वीच्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून, मुंबईत रात्रभर पायपीट !

मुंबई – नाशिकहून सुमारे 200 किलोमीटर पायी प्रवास केलेले शेतकरी बांधव विधानभवानाजवळ पोहचले आहेत. आज सकाळी ते 7 च्या सुमारास मुंबईच्या आझाद मैदानाजवळ पोहचले. खरंतर ठरल्याप्रमाणे आज दिवसभर मुंबईतून  प्रवास करुन आझाद मैदानात पोहचणार होते. मात्र आजपासून दहावीचा पेपर सुरू झाला आणि दिवसा मुंबईत प्रवास केला असता तर मुंबई ठप्प झाली असती. त्यामुळे रात्रीच त्यांनी आझाद मैदानाकडे कूच केली. आणि मुंबईतील विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची आणि एकूणच मुंबईकरांची गैरसोय टाळली. त्याबद्दल मोर्चेकरी शेतक-यांचे आभार मानवे तेवढे कमीच आहेत.

रात्री 9 वाजता मोर्चेकरी सायनच्या सोमय्या ग्राऊंडवर आले. ठरल्याप्रमाणे रात्रीची त्यांची विश्रांती तिथेच होती. रात्रभराच्या विसाव्यानंतर आज सकाळी ते विधानभवनाकडे कूच करणार होते. मात्र मुंबईकरांची संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी रात्री 2 वाजताच त्यांनी सोमय्या ग्राऊंड सोडले. रात्री 9 वाजता तिथे पोहचल्यानंतर रात्री उशीरपर्यंत राज ठाकरेंसह अनेक नेते तिथे भेट द्यायला गेले होते. त्यामुळे जेवण आणि नेत्यांच्या भेटीगाठी यासाठी रात्रीचे बारा वाजले. त्यामुळे केवळ 2 तास मोर्चेक-यांना सोमय्या ग्राऊंडवर विश्रांती मिळाली. ठाण्याहून जवळपास 20 ते 22 किलोमीटरचा प्रवास करुन आल्यानंतर केवळ 2 तासांची विश्रांती घेऊन सर्वच मोर्चेकरी रात्रीतूनच पुढच्या 15 किलोमीटरच्या प्रवासाला निघाले. स्वतःच्या त्रासाची पर्वा न करता आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये असं विचार करणारे आंदोलक खूपच विरळ आहेत. म्हणूनच शेतकरी बांधवांना सलाम करायला पाहिजे.

 

COMMENTS