कांद्याला 51 पैसे किलोला भाव,  संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्याने केली मुख्यमंत्र्यांना 216 रुपयांची मनी ऑर्डर !

कांद्याला 51 पैसे किलोला भाव, संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्याने केली मुख्यमंत्र्यांना 216 रुपयांची मनी ऑर्डर !

येवला – कांद्याला 51 पैसे किलोला बाजारभाव मिळाल्याने संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 216 रुपयांची मनी ऑर्डर केली आहे. येवला बाजार समितीच्या अंदरसुल उपबाजार समितीमध्ये 5 क्विंटल 45 किलो कांद्याला मिळाला. 51 रुपये प्रतिक्विंटल म्हणजे 51 पैसे किलोला कवडीमोल बाजार भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.

अंदरसुल येथील चंद्रकांत भिकनराव देशमुख असे कांदा उत्पादक शेतकऱ्याचे नाव आहे. 5 क्विंटल म्हणजेच 45 किलो कांद्याचे 270 रुपये 95 पैसे 51 रुपयाप्रमाणे त्यांना पैसे मिळाले. या शेतकय्राला हमाली 37 रुपये 2 पैसे, तोलाई 24 रुपये तर 93 पैसे इतर खर्च झाला आहे. 270 रुपये 95 पैसे वजा जाऊन त्यांना 216 रुपये हातात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या देशमुख यानी मुख्यमंत्र्यांनाच पाठवून दिले आहेत.

COMMENTS