नवी दिल्ली – दिल्लीच्या वेशीवर आंदोलनक शेत-यांना पोलिसांनी आज रोखल आहे. यावेळी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केल्यामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी आणि अन्य मागण्यांसाठी देशभरातील शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीकडे निघाला होता. दिल्लीच्या वेशीवर हा मोर्चा पोहचताच पोलिसांनी अडवला आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, दीडपट हमीभाव, कर्जमाफी, वीज दरकमी करणे अशा विविध मागण्यांसाठी देशभरातील शेतकरी दिल्लीत धडकले आहेत.
दरम्यान २३ सप्टेंबरला हरिद्धारमधून पदयात्रेला सुरुवात झाली होती. सोमवारी १ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत चर्चा विस्कटल्यानंतर शेतकरी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. भारतीय किसान युनियनने ‘किसान क्रांती यात्रा’ या मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात ५० हजारहून अधिक शेतकरी सहभागी झाले आहेत. २ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील राजघाट येथे या यात्रेचा समारोप होणार होता. परंतु शेतक-यांची ही यात्रा दिल्लीच्या वेशीवर येताच पोलिसांनी ती थांबवली आहे.
हा मोर्चा रोखण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. मोर्चेकरी येताच पोलिसांनी त्यांना रोखले. जमाव आक्रमक असल्याने पोलिसांनी बळाचा वापर करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.
COMMENTS