गिरीश महाजनांच्या कार्यालयाबाहेर केळी फेको आंदोलन !

गिरीश महाजनांच्या कार्यालयाबाहेर केळी फेको आंदोलन !

जळगाव – जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयाबाहेर केळी फेको आंदोलन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँगेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं असून नुकसान झालेली ट्रॅक्टरभर केळी  गिरीश महाजनांच्या कार्यालयाबाहेर फेकण्यात आली आहे. तसेच या आंदोलनादरम्यान पोलीस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली असल्याची माहिती आहे.

दरम्यान वादळी वा-यासह आलेल्या पावसामुळे जिल्हाभरातील केळी उत्पादक शेतक-यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतक-यांच्या अडचणीत वाढ झाली असून या शेतक-यांना मदत करण्याबाबत आज राष्ट्रवादीन आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नुकसान झालेली ट्रॅक्टरभर केळी गिरीश महाजनांच्या कार्यालयाबाहेर फेकली असून या शेतक-यांना नुकसानभपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी नुकसानीची पाहणी करण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे रावेर तालुक्यात गेले होते. त्यावेळी राष्ट्रवादी किसान सेलचे अध्यक्ष सोपान पाटील यांच्यासोबत त्यांचा वाद झाला होता. या वादात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करणाऱ्या काही चित्रफिती व्हायरल करण्यात आल्या होत्या. महाजन यांच्या वर्तनाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं केळी फेको आंदोलन केल्याची माहिती आहे.

 

COMMENTS