अमरावती – बोगस बी टी बियाणे कंपनीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर करणार आहे. राशी,अंकुर,बायर बी टी बियाणे कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. बोंड अळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकरी संजय साबळे, देवेंद्र भुयार यांच्यासह शेतकरीवर्गाने वरुड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान यावर्षी अमरावती जिल्ह्यात पर्यायांने वरुड, मोर्शी तालुक्यात बि टी कपाशीच्या लागवडीनंतर लगेचच 60 दिवसाच्या कालावधीत कपसाच्या फुले, पात्यांवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भव झाला आहे. वाडेगाव तेथील शेतकरी श्री संजय साबळे यांच्या शेतात गुलाबी बोंडअळीचा 100 टक्के प्रादुर्भाव झाल्याचे वरुड तालुक्का कृषी विभागाच्या मोक्का पाहणी अहवालातून स्पष्ट झाले असल्याचं स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. तसे त्या पंचनाम्याचा अधार घेऊन लागवड झलेली राशी, अंकुर, बायर या बी टी कपाशीची बियाणे आहेत. त्यामुळे या कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा,त्यांचे परवाने त्वरित रद्द करण्यात यावे तसेच झालेल्या नुकसानिची भरपाई हमीभावानुसार कंपनीकडून पूर्ण वसुल करण्यात यावी अशी लेखी तक्रार शेतकरी संजय साबळे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयार यांनी आज दाखल केली आहे.
अमरावती जिल्हात 2018-19 च्या खरिपामध्ये कपाशीची लागवड 4 लक्ष 30 हजार हेक्टर तर वरुड तालुक्यात 33 हजार हेक्टर आणि मोर्शी तालुक्यात 28 हजार हेक्टर क्षेत्र असुन यावर्षी वरुड तालुक्याच्या वाडेगाव येथील शेतकरी संजय साबळे यांच्या मौज्जा गाडेगाव गट न 106 व 107 मध्ये 2 हेक्टर शेत्रावार डोंमकळीमध्ये गुलाबी अळीचा 100 टक्के प्रादुर्भाव झाल्याचे कृषी अधिकारी आगरकर, प स कृषी अधिकारी साळवे यांनी दिनाक 15,8,2018 च्या प्रत्यक्ष शेत पाहणी अहवालात लेखी नमुद केले व राशी,अंकुर,बायर या कापूस बियाणे कंपनीचे बियाणे सदोष असल्याचे अहवालाअंती निदर्शनात आणून दिले. तसेच वरुड तालुक्यातील 7 महसुली मडळामध्ये सुध्दा गुलाबी बोंडअळी हल्ला होणार असल्याचा दावा सुध्दा कृषी विभागाने केला आहे. आणि त्याच अहवालाच्या अनुषंगाने संबंधीत बियाणे कंपनीवर शेतकरी फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असल्याचं साबळे यांनी म्हटलं.
COMMENTS