मुंबई – . “भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना कळताच मन सुन्न झाले. ही घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे, अशा शब्दात भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी आपली भावना व्यक्त केली.
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला. मध्यरात्री ही घटना घडली. भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आगीची ठिणगी पडली. बॉर्न युनिटमधून धूर निघत असल्याचं रुग्णालयात असलेल्या नर्सच्या निदर्शनास आलं. नर्सने दार उघडून बघितलं असता सगळीकडे प्रचंड धूर झाला होता. नर्सने लागलीच ही माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर सगळीकडे धावपळ सुरू झाली.
या मुद्द्यावर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली. “भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना कळताच मन सुन्न झाले. ही घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी. भविष्यात अशी हानी पुन्हा होऊ नये म्हणून प्रत्येक सरकारी हॉस्पिटलमध्ये अग्निशमन यंत्र पाहिजे आणि ते कसे वापरावे याचं प्रशिक्षण तिथल्या व इतर ला दिले गेले पाहिजे”, अशी मागणी त्यांनी उद्धव ठाकरे सरकारकडे केली.
COMMENTS