आमदार रवी राणांच्या अडचणीत वाढ, ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल !

आमदार रवी राणांच्या अडचणीत वाढ, ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल !

अमरावती   बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खासदार आनंदराव अडसूळ यांनी केलेल्या तक्रारीनंतर बदनामी केल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी रविवारी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनि यमासह विविध कलमान्ये गुन्हे दाखल केले आहेत. मुंबई येथील दी सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेत ९०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची दिशाभूल करणारी माहिती माध्यमांना देऊन बदनामी केली असल्याची तक्रार खासदार अडसूळ यांनी केली आहे.

दरम्यान खासदार अडसूळ यांनी राजकीय पदाचा वापर करून बँकेतील खातेदार, पेन्शनधाक व कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या रकमेवर गदा आणल्याचा आरोप रणा यांनी केला होता. या घोटाळ्यात अडसूळ यांच्यासह त्यांचे स्वीय सहायक सुनील भालेराव यांचा सहभागी असून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणीही राणा यांनी केली होती. परंतु सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेची एकूण संपत्ती ही ८०० कोटींची असल्यामुळे ९०० कोटी रुपयांचा घोटाळा होणार कसा, असा प्रश्न अडसूळ यांनी उपस्थित केला होता. तसेच ४०० कोटींचे कर्ज, ९० कोटींचे एनपीए असून ७० कोटी कर्जाची वसुली झाली. दोन शाखा व्यवस्थापकांकडून हे प्रकरण झाल्याने त्यांची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी या प्रकरणात कारवाई करण्यात आली असल्याचंही अडसूळ यांनी म्हटलं आहे. खासदार अडसूळ यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला असल्यामुळे रवी राणा यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS