पुणे – कोल्हापूरचे माजी खासदार व भाजपचे नेते धनंजय महाडिक यांच्या मुलाचा पुण्यात शाही विवाह सोहळा दोन दिवसापूर्वी झाला होता. या सोहळ्यास राज्यातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. त्यापैकी बहुतेक जण कोरोना पाॅझिटिव्ह झाले. त्यामुळे सोशल मिडीया वरती अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आणि बड्या लोकांना सूट? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. अखेर याप्रकरणी पुणे पोलिसांनी धनंजय महाडिक व इतर तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वाढ त्या कोरोनाच्या संसर्ग थांबवण्यासाठी सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घातली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी आपले दौरे व मेळावे रद्द केला. मात्र, त्यावेळी माजी खासदार महाडिक यांच्या मुलांच्या पुण्यात पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार, मंत्री छगन भुजबळ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थित दर्शवली होती. मात्र यातील काही नेत्यांनीच मास्क घालणं टाळलं असल्याचे पाहायला मिळाले. तसंच या विवाह सोहळ्यात नेत्यांसमोरच सोशल डिस्टन्सिंगचा देखील पुरता फज्जा उडाला होता. त्यामुळे नियम घालून देणारेच नियमांच उल्लंघन करत असतील तर सर्वसामान्य जनतेकडून काय अपेक्षा करणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
महाडिक यांच्या मुलाच्या लग्नाची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात झाली होती. मात्र या लग्न सोहळ्यात कोरोना प्रतिबंधक नियमाचे उल्लंघन करण्यात आले असल्याचे पाहायला मिळाले होते. आता याच प्रकरणी धनंजय महाडिक यांच्यासह तीन जणांवर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS