नागपुरातील भाजप आमदारावर भूखंड बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल !

नागपुरातील भाजप आमदारावर भूखंड बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल !

नागपूर – नागपुरातील भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार असलेले सुधाकर कोहळे यांच्यावर भूखंड बळकावल्याप्रकरणी  फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील जानकीनगरमध्ये बनावट दुरुस्तीद्वारे भूखंड बळकावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामुळे आमदार सुधाकर कोहळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दरम्यान आमदार सुधाकर कोहळे यांनी जानकीनगरमधील एका गृहनिर्माण संस्थेचा सार्वजनिक भूखंड आपल्या नावावर करुन घेतल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते मोरेश्वर घाडगे यांनी केला आहे. या सोसायटीचे सचिव धर्मेंद्र जैन यांच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला निबंधक कार्यालयात हजर करून बनावट विक्री करण्यात आल्याचा आरोप कोहळेंवर करण्यात आला आहे. त्याचबरोबर कोहळे यांच्यासह अशोक जैन, पंढरी कडू, मनोज राऊत व सचिन जैन यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागपुरातील भाजप आमदारावर आणि शहराध्यक्षांवर अशाप्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.

COMMENTS