नवी दिल्ली – ११.०० वाजता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडे सामान्यांसह सर्वांचं लक्ष लागलं आहे. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थमंत्री अरूण जेटलींची टीम अर्थमंत्रालयात दाखल झाली आहे. अर्थमंत्री संसदेत दाखल होण्यापूर्वी अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक नियोजित करण्यात आली होती. त्यानंतर अर्थसंकल्पावर कॅबिनेटकडून मंजुरी मिळणार आहे. त्यानंतर अर्थसंकल्प संसदेत सादर केलं जाणार आहे.
Delhi: Finance minister Arun Jaitley and his team ahead of the #UnionBudget2018 presentation pic.twitter.com/LrECFu4gYP
— ANI (@ANI) February 1, 2018
अर्थमंत्री अरुण जेटली पहिल्यांदाच हिंदी भाषेतून अर्थसंकल्प सादर करणार असून जीएसटी लागू झाल्यानंतर मोदी सरकारचं हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे यामध्ये काय काय बदल होणार आहेत. काय महागणार आहे, काय स्वस्त होणार आहे. याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS