नवी दिल्ली – आज अर्थमंत्री पियुष गोयल भाजप सरकारचा सहावा अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पामध्ये आगामी निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. 5 लाखांपर्यंत उत्पन्नावर करमुक्ती देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यामुळे याचा फायदा जवळजवळ 4 कोटी करदात्यांना होणार आहे. त्याचबरोबर छोट्या शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान मानधन योजनेची घोषणा सरकारने केली आहे. या योजनेनुसार अशा शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. डिसेंबर 2018 पासून ही मदत मिळणार असून पहिला 2 हजारांचा हफ्ता येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. निवडणुकीच्या आधी सरकार ही रक्कम जमा करण्याची शक्यता आहे.
दरम्यान निवडणुका तोंडावर आल्यामुळे शेतकरी, मध्यमवर्ग आणि करदात्यांना खूष करणारा हा अर्थसंकल्प असेल असा अंदाज लावण्यात येत आहे. निवडणुका जवळ असल्याने कठोर निर्णय घेऊन सरकार कुठल्याही घटकांना नाराज करण्याची शक्यता नाही. उलट विविध घटकांसाठी सवलती आणि घोषणांचा पाऊस अर्थसंकल्पातून पडेल अशीच शक्यता आहे.
COMMENTS