नुकसानग्रस्त शेतकय्रांना मदत जाहीर, काळी टोपी घालून राज्यपालांनी चेष्टा केली -राजू शेट्टी

नुकसानग्रस्त शेतकय्रांना मदत जाहीर, काळी टोपी घालून राज्यपालांनी चेष्टा केली -राजू शेट्टी

मुंबई – नुकसानग्रस्त शेतकय्रांसाठी राज्यपालांकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. खरीप पिकांच्या नुकसानीसाठी 8 हजार रुपये प्रति हेक्टर तर फळपिकांसाठी 18 हजार रुपये प्रति हेक्टर मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच दोन हेक्टपर्यंतच ही नुकसान भरपाई
मिळणार आहे. याशिवाय शेतसारा आणि शाळा, महाविद्यालयातील परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार असल्याचंही यामध्ये जाहीर करण्यात आलं आहे. राज्यपालांनी तातडीने मदत वाटप करण्याचे आदेश राज्य प्रशासनाला दिले आहेत.

दरम्यान अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. मात्र तूर्तास शेतकऱ्यांना सरकारने किंचितसा दिलासा दिला आहे. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारच्या या मदतीवर टीका केली आहे. राज्यपालांनी बाहेर पडून नुकसानीची पाहणी करावी. ही मदत म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा आहे. काळी टोपी घालून राजभवनात बसून शेतकऱ्यांचं दु:ख कळणार नाही, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

COMMENTS