भाजपचे संकटमोचक संकटात

भाजपचे संकटमोचक संकटात

जळगाव : भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या संकटात दिवसेंदिवस वाढ होत आहे. भाईचंद रायसोनी मल्टीस्टेट सोसायटी गैरव्यवहारप्रकरणी त्यांचे नाव आल्याची घटना ताजी असताना रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात शिक्षण संस्थेचा कारभार ताब्यात घेण्यासाठी चाकूचा धाक दाखवत धमकावल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, आमदार गिरीश महाजन यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणातील हा हा गलिच्छ प्रकार असून अॅड. विजय पाटील यांचा बोलवता धनी वेगळा असल्याचंही आमदार महाजन यांनी म्हटलं आहे. वर्षांआधी घटलेल्या घटनेप्रकरणी आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालयामार्फत सखोल चौकशी व्हावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.

याबाबत माहिती अशी की, मराठा विद्या प्रसारक मंडळाची 2015 मध्ये निवडणूक झाली होती. त्यात नरेंद्र भास्करराव पाटील यांच्या गटानं सहकार कायद्यानं निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे त्यांचे 18 सभासद निवडून आले होते. तेव्हापासून मराठी विद्या प्रसारक मंडळ पाटील गटाच्या ताब्यात होती. यानंतर भोईटे गटाने धर्मदायकडील नोंदणीचा आधार घेत संस्था आपल्याच ताब्यात घेतली होती.  विजय पाटील यांनी गेल्या 9 डिसेंबरला दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचा ताबा मिळवण्यासाठी तानाजी भोईटे आणि त्यांच्या नातेवाईकांनी आपल्याला संस्थेची कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने जानेवारी 2018 मध्ये पुण्यात बोलावून घेतलं होतं. तिथे मला चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. सर्व संचालक मंडळातील सर्व सदस्यांचे राजीनामे घेऊन संस्थेचा कारभार आमदार गिरीश महाजन यांच्या हातात द्यावा, अशी धमकी दिली. त्याचवेळी आमदार गिरीश महाजन यांनी व्हिडिओ कॉल करून 1 कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असं अॅड. विजय पाटील यांनी रावेर तालुक्यातील निंभोरा पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. यावरून गिरीश महाजन यांच्यासह सुनील झंवर यांना आरोपी करण्यात आलं आहे.

 

COMMENTS