शिवसेना जिल्हाप्रमुखावर फसवणुकीचा गुन्हा दाखल !

शिवसेना जिल्हाप्रमुखावर फसवणुकीचा गुन्हा दाखल !

नाशिक –  शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण कांदे यांच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल सुभाष जाजू यांच्या फिर्यादीनुसार, सुहास कांदे यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीन व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान पोलिसात दाखल होत असलेले गुन्हे खोटे असल्याचं सुहास कांदे यांनी म्हटलं आहे. जमीन फसवणूकप्रकरणामध्ये आपला कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष सहभाग नाही. मानकर व जाजू यांच्यात मध्यस्थी न केल्याच्या वैमनस्यातून सदरचे खोटे आरोप करीत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं कांदे यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण ?

जाजू यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून 2010 मध्ये कांदे यांनी वडाळा गटातील जमीन खरेदी करण्यासाठी गळ घातल्याचा आरोप केला आहे. तसेच 50 गुंठे जागेचे बनावट कागदपत्रे बनवून हा व्यवहार करण्यात आला. मात्र अधिक विचारणा केली असता, कांदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप जाजू यांनी केला. त्यामुळे संशय आल्याने आपण जागेच्या कागदपत्रांची शहानिशा केली असता, जागा 19 गुंठे असून त्याचे कागदपत्रेही बनावट असल्याचा आरोप जाजू यांनी केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

COMMENTS