नवी दिल्ली – जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिदवर आज अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला आहे. या गोळीबारातून उमर खालिद बचावला असून त्याच्यावर भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांनीच हल्ला केला असल्याचा आरोप गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केला आहे. दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लब येथे सोमवारी सकाळी एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमात उमर खालिदही सहभागी होणार होता. सकाळी खालिद क्लबच्या बाहेर पोहोचताच अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर गोळीबार केला. सुदैवाने उमर खालिदने तिथून पळ काढला आणि तो बचावला.
My reaction on Umar Khalid pic.twitter.com/wkjOLFyip3
— Jignesh Mevani (@jigneshmevani80) August 13, 2018
दरम्यान ज्या लोकांनी गौरी लंकेश, दाभोळकर, कलबुर्गी आणि पानसरे यांची हत्या केली त्याच लोकांनी म्हणजे संघ परिवार आणि भाजपशिवाय उमर खालीदवर हल्ला करणारा दुसरा कोणीच नसल्याचा दावा जिग्नेश यांनी केला आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी या घटनेबाबात वक्तव्य करणं गरजेचं असून त्यांनी उमर खालिद याला पोलीस प्रोटेक्शन देण्याची मागणीही जिग्नेश यांनी केली आहे. तसेच गेली चार दिवसांपासून मलाही मारण्याची धमकी येत असल्याचही जिग्नेश मेवाणी यांनी म्हटलं आहे.
COMMENTS