नवी दिल्ली – आजपर्यंत देशातील कोणत्याही राज्यात एक मुख्यमंत्री असल्याचं तुम्ही पाहिलं असेल परंतु आंध्र प्रदेश सरकारमध्ये तुम्हाला एक-दोन नाही तर तब्बल पाच मुख्यमंत्री पहायला मिळणार आहेत. मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी हा निर्णय घेतली असून हे पाच उपमुख्यमंत्री अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय जाती, अल्पसंख्याक आणि कापू समाजातील असणार आहेत. जगमोहन रेड्डी यांनी शुक्रवारी पार पडलेल्या विधीमंडळाच्या बैठकीत ही घोषणा केली आहे. त्यामुळे देशात पहिल्यांदाच एखाद्या मंत्रिमंडळात पाच उपमुख्यमंत्री असणार आहेत.
दरम्यान आंध्र प्रदेशमध्ये शनिवारी २५ जण मंत्रीपदाची शपथ घेतील अशी माहिती जगमोहन रेड्डी यांनी दिली आहे. तसेच अडीच वर्षांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल असं जगमोहन रेड्डी यांनी सांगितलं आहे. आपल्या कामगिरीवर लोकांचं बारीक लक्ष असल्याने त्यांच्या समस्यांकडे नीट लक्ष देऊन सोडवा अशी सूचना जगमोहन रेड्डी यांनी नेत्यांना केली आहे. मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये पार पडलेल्या बैठकीत सर्व नवनिर्वाचित आमदार उपस्थित होते. यावेळी त्यांनी लोकांच्या अपेक्षा लक्षात घेता आपण नवीन मंत्र्यांची नियुक्ती करत असल्याचं सांगितलं.
COMMENTS