‘हे’ पाच नेते उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

‘हे’ पाच नेते उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

मुंबई – काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील पाच नेते उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, काँग्रेस नेते आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह, सत्यजित देशमुख दुपारी 03 वाजता गरवारे क्लब मुंबई येथे या नेत्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. तर सायंकाळी ५ वाजता वाशी नवी मुंबई येथे राष्ट्रवादीचे आमदार गणेश नाईक आणि आनंदराव पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आघाडीला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हे प्रवेश होणार आहेत.

दरम्यान काँग्रेस आमदार आनंदराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली होती. अनेक वर्षांपासून पक्ष बांधणीचे काम मी केले पण काँग्रेसमधून मला बाहेर काढण्याचा जाणीवपूर्वक कट केला गेला असल्याचा आरोप आनंदराव पाटील यांनी केला आहे. मला डावलले जात आहे.

तसेच इंदापूर येथील काँग्रोसचे ज्योष्ठ नेते असलेले हर्षवर्धन पाटीलही उद्या भाजपात जाणार आहेत. इंदापूर विधानसभेच्या जागा वाटपावरून हर्षवर्धन पाटील नाराज होते. इंदापूरच्या गाजलेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे भाजप प्रवेशाची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असून ते इंदापूर विधानसभेची जागा भाजपकडून लढविण्याची शक्यता आहे.

पाटील यांच्या या निर्णयामुळे राज्यातील काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील सहकार क्षेत्रातील जेष्ठ नेते म्हणून पाटील यांची ओळख आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघांचे ते 4 वेळा आमदार होते. सलग 3 वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या युती शासनात 5 वर्षे मंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. त्यानंतर आघाडी शासनात 14 वर्षे मंत्री म्हणून उत्कृष्ठपणे काम केलं आहे. एकूण 6 मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम केलं आहे. तसेच उत्कृष्ठ संसदीय कार्यमंत्री म्हणून तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते विधीमंडळात त्यांचा गौरव करण्यात आला होता.

COMMENTS