कोल्हापूर, सांगलीत पावसाने हाहाकार, आवश्यक वेळी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करणार – मुख्यमंत्री

कोल्हापूर, सांगलीत पावसाने हाहाकार, आवश्यक वेळी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करणार – मुख्यमंत्री

कोल्हापूर – जोरदार सुरु असलेल्या पावसामुळे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये हाहाकार माजला आहे. याठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालं असून पुरामुळे अनेकांचा जीव गेला आहे तर काहींची घरं पाण्याखाली गेली आहेत. या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वत: कोल्हापुरात जाऊन पाहणी ककेली आहे. दरम्यान, पुरामुळे घडलेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. तर आवश्यक त्या वेळी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करणार असल्याचही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आज मुख्यमंत्र्यांनी पूरपरिस्थितीची हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.सांगली आणि कराड दोन्ही ठिकाणी उतरणं सोयीचे नसल्याने हवाई पाहणी केली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच केंद्र सरकारही राज्यातील संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील आवश्यक ती मदत पुरवणार असल्याचे आश्वासन दिलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना राज्य सरकार मदत करणार आहे. तसेच पडलेल्या घरांकरिता आणि अन्न धान्यासाठीही राज्य सरकार मदत करत आहे. तसेच आवश्यक ती अतिरिक्त मदत करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पूरस्थितीमुळे 2 लाख ग्राहकांचा वीज पुरवठा बंद आहे. तो कसा चालू करता येईल यावरही विचार सुरू असल्याचं ते म्हणाले आहेत.

तसेच या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी अनेकांची मदत आपण घेतली. ओदिशा, पंजाब, गोवा आणि राज्यातली पथकं या ठिकाणी बचावकार्यात सहभागी झाले आहेत. सांगलीतील स्थिती सर्वाधिक भीषण असून काही भाग सोडला तर संपूर्ण शहर पाण्याखाली आहे. कालपर्यंत 11 पथके तेेथे बचावकार्यात सहभागी होती. आज नौदल, एनडीआरएफची अतिरिक्त पथके  त्या ठिकाणी पोहोचली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS