मुंबई – कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूरामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झालो आहे. यासाठी सरकारद्वारे 154 कोटी रुपयांचा निधी मदत म्हणून वर्ग करण्यात आला आहे. हा निधी मृत व्यक्तींचे परिवार, जखमी तसेच पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे. हा निधी संबंधितांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्याचे निर्देश सरकारने दिले होते. परंतु आता सरकारनं आपला निर्णय मागे घेतला असून राज्य सरकारचा पूरग्रस्त नागरिकांना रोखीने मदत करणार आहे. सरकारकडून रोखीने मदत देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. जिथे नागरिकांना अडचण आहे तिथे रोखीने मदत दिली जाणार आहे.
सरकारने हा निधी संबंधितांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्याचे निर्देश दिल्यानंतर काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला होता. आपत्तीत आजवर शासकीय मदत ही रोख दिली गेली. पण आता शासनाने मदत बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. लोकांचे संसार उद्धवस्त झाले असताना बँकेच्या वाऱ्या करायला लावणं योग्य नाही. शनिवार/रविवारी बँका बंद असतात. तसेच अनेकांच्या घरात पाणी घुसल्यामुळे बँकेचे सर्व कागदपत्र गहाळ झाले आहेत. त्यामुळे बँक व्यवस्थापन लोकांपर्यंत पोहचवा अशी विनंती, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्राद्वारे केली होती. त्यानंतर सरकारने आपला निर्णय मागे घेतला असून आता पूरग्रस्तांना रोखीने मदत दिली जाणार आहे.
COMMENTS