झारखंड – लालू प्रसाद यादव यांना दिलासा देण्यास झारखंड हायकोर्टानं नकार दिला आहे. लालू प्रसाद यांना जामीनाचा कालावधी वाढवून देण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. तसेच ३० ऑगस्टपर्यंत पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत.दरम्यान ह्रदयविकार, मधूमेह आणि अन्य कारणास्तव जामिनाची मुदत तीन महिने वाढवण्याची विनंती लालू प्रसाद यादव यांनी हायकोर्टाकडे केली होती. परंतु मुदत वाढवण्यास हायकोर्टानं नकार दिल्यामुळे लालू प्रसाद यादव यांना 30 ऑगस्टपर्यंत पोलिसांसमोर हजर व्हावे लागणार आहे.
दरम्यान चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ११ मे रोजी हायकोर्टाने लालूप्रसाद यादव यांना जामीन मंजूर केला होता. २९ जून रोजी त्यांच्या जामिनाची मुदत तीन आठवड्यांसाठी वाढवण्यात आली होती. या कालावधीत यादव यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव त्यांना १७ ऑगस्टपर्यंत जामीन मंजूर करण्यात आला होता. परंतु आजा ही तारीख वाढवण्यात येणार नसल्याचं हायकोर्टानं म्हटलं आहे.
COMMENTS