अमेठी – लोकसभा निवडणुकीसाठी देशात आज पाचव्या टप्प्याचे मतदान होत आहे. अमेठीमधल्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून इथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी विरुद्ध केंद्रीय मंत्री स्मृती इराणी असा सामना होत आहे. यादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी गंभीर आरोप केला आहेत.राहुल गांधी हे मतदान केंद्र ताब्यात घ्यायला येत आहेत. ते मतदान केंद्र बळकाविण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्यांनी म्हटलं आहे. स्मृती इराणी यांनी एक व्हीडिओ शेअर करत हे आरोप केले आहेत. एका महिलेला मत द्यायचं होतं कमळाला पण त्या महिलेचा हात पकडून तिला बळजबरीने पंजाला मतदान करायला लावले, असा आरोप व्हीडिओमध्ये त्या महिलेने केला आहे. तो व्हीडिओ स्मृती इराणी यांनी शेअर केला आहे.
हाथ पकड़कर जबरदस्ती पंजा पर धर दिहिन हम देहे जात रहिन कमल पर ( कमल पर देना चाहती थी, जबरदस्ती पंजा पर डलवा दिया)
यह मामला गौरीगंज के गूजरटोला बूथ नंबर 316 का है जहाँ पीठासीन अधिकारी ने जबरदस्ती कांग्रेस को डलवा दिया ।।@smritiirani @ECISVEEP @AmethiDm pic.twitter.com/RR9jv4pUF0
— Chowkidar Vivek Maheshwari (@im_VMaheshwari) May 6, 2019
दरम्यान गौरीगंजमधल्या गुजरटोला बुथ नंबर 316 मधील ही घटना असून मतदान केंद्रातील निवडणूक अधिकाऱ्यावर स्मृती इराणी यांनी जबरदस्तीने काँग्रेसला मतदान करायला लावल्याचा आरोप केला आहे.निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी केली आहे. प्रशासन आणि निवडणूक आयोगाला सर्तक करण्यासाठी मी हा व्हिडिओ टि्वट केला. ते कारवाई करतील अशी अपेक्षा आहे असं इराणी यांनी म्हटलं आहे.
COMMENTS