माजी महिला राज्यमंत्र्याला सासरच्यांकडून जाळून मारण्याचा प्रयत्न, आगीत 10 टक्के भाजल्या !

माजी महिला राज्यमंत्र्याला सासरच्यांकडून जाळून मारण्याचा प्रयत्न, आगीत 10 टक्के भाजल्या !

जौनपूर – कायदा कडक करण्यात आला असतानाही देशभरात सासरच्यांकडून महिलांवरील जाच वाढत असल्याचं दिसत आहे. उत्तर प्रदेशातील माजी राज्यमंत्री असलेल्या संगीता यादव यांनाही सासरच्यांचा जाच सहन सरावा लागला आहे. रविवारी रात्री जौनपूर जिल्‍ह्यातील विठुआ कला येथे सासरच्यांकडून संगीता यादव यांना जाळण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान याबाबतचा आरोप संगीता कदम यांनी त्यांच्या सासू, सासरे आणि पतीवर केला आहे. त्‍या खोलीत झोपलेल्‍या असताना त्‍यांचे हातपाय बांधण्‍यात आले व नंतर त्‍यांच्‍यावर रॉकेल ओतून त्‍यांना पेटवण्‍यात आले यामध्ये त्या गंभीर स्थितीत असून त्यांना उपचारासाठी वाराणसी येथे हलवण्‍यात आले असल्याची माहिती आहे.

दरम्यान संगीता यांचे माहेर मछलीशहर पोलिस ठाण्‍याच्‍या हद्दीतील कताहित गाव असून 2016 मध्‍ये बदलापूर येथील दुर्गेश यादव यांच्‍यांशी त्‍यांचा विवाह झाला होता. संगीता या सपाच्या नेत्या असून त्या त्‍यांच्‍या विवाहात शिवपाल यादवसह अनेक दिग्‍गज सहभागी झाले होते. संगीता आपल्‍या पत्‍नीसह लखनऊ येथे राहतात. तीन दिवसांपूर्वीच त्‍या आपल्‍या सासर विठुआ कला येथे आल्‍या होत्‍या. तसेच संगीता आणि त्‍यांच्‍या पतीमध्‍ये नेहमी वादविवाद होत असे. यावरून त्‍यांच्‍या सासरी नुकतीच एक बैठकही झाली होती अशी माहिती आहे. तसेच याबाबत पोलिसांनी संगीता यादव यांच्या सास-यांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे.

 

 

COMMENTS